Sheikh Hasina | सध्या बांगलादेशमध्ये हे हिंसक आंदोलन सुरू आहे त्याच्यावर सगळ्यांच्या नजरा आहेत. या सगळ्यात पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेला आहे. आणि त्यांनी तो देश देखील सोडून दिलेला आहे. आज आपण शेख हसीना यांच्या वैयक्तिक आयुष्य बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. शेख हसीना यांचे आयुष्य अनेक चढ-उतारांनी भरलेले होते. त्यांचे आई-वडिलांनी तीन भावांची हत्या झाली. त्यानंतर त्यांनी अत्यंत हलाखीमध्ये आयुष्य काढलं. राजकारणातही अनेक वेळा त्यांना हार पचवावी लागली. त्या 2009 पासून पंतप्रधान या पदावर होत्या. परंतु आता त्यांना हे पद सोडावे लागलेले आहे. बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेला आहे.
शेख हसीना यांचा प्रवास | Sheikh Hasina
शेख हसीना यांचा जन्म 28 सप्टेंबर 2017 रोजी झाला. बांगलादेशाचे संस्थापक शेख मुजिबूर रहमान हे त्यांचे वडील होते. घरातील त्या सर्वात मोठ्या होत्या. त्यांचे बालपण हे पूर्व बंगालमध्ये गेले. तेथेच त्यांचे शालेय शिक्षण देखील पूर्ण झाले. त्यानंतरचा काही काळ त्या शेगूनबाही या ठिकाणी राहिल्या. आणि त्याचे संपूर्ण कुटुंब बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका या शहरांमध्ये स्थलांतरित झाले.
राजकारणात प्रवेश
शेख हसीना यांना सुरुवातीला राजकारणात कोणत्याही प्रकारचा रस नव्हता. परंतु 1966 मध्ये ईडन महिला महाविद्यालयात शिकत असताना त्यांना राजकारणात जास्त इंटरेस्ट निर्माण झाला. त्यानंतर विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवून त्या उपाध्यक्ष झाल्या. त्यानंतर त्यांनी त्यांच्या वडिलांचा आवामी लीग पक्षाचे काम सांभाळण्याचा निर्णय घेतला. आणि युनिव्हर्सिटी ऑफ ढाकामधील विद्यार्थी राजकारणातही त्या सक्रिय झालेल्या होत्या.
आई-वडिलांनी भावाची हत्या | Sheikh Hasina
राजकारणाचे हसीना यांचा प्रवास चांगल्या प्रकारे चालू होता. परंतु 1975 साली त्यांच्या आयुष्यातील काळरात्र आली. ती म्हणजे बांगलादेशाच्या लष्करानं बंड केलं. व त्यांच्या कुटुंबाविरुद्ध बंड पुकारले. या सैनिकांनी शेख हसीना यांची आई वडील शेख मुजीबुर रेहमान आणि तीन भावांची हत्या केली. त्यावेळीस शेख हसीना या त्यांचे पती आणि छोट्या बहिणी सोबत युरोपमध्ये होत्या. त्यामुळे ते या हल्ल्यातून वाचल्या. त्यानंतरचा काही काळ त्यांनी जर्मनीमध्ये घालवला. इंदिरा गांधींचे सरकार आले त्यावेळी त्या भारतात आल्या होत्या. आणि त्यानंतर त्यांच्या बहिणी सोबत दिल्लीमध्ये आल्या.
1981 मध्ये शेख हसीना या बांगलादेशात परत आल्या. आणि विमानतळावर पोहचल्या, तेव्हा त्यांचे स्वागत करण्यासाठी कितीतरी नागरिक तिथे उपस्थित होते. तिथे गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या वडिलांचा पक्षाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. 1986 मध्ये त्यांनी पहिल्यांदा त्या सर्वसाधारण निवडणुकीत उतरल्या आणि परंतु त्यांची हार झाली. त्यावेळी त्या विरोधी पक्षनेत्या म्हणून निवडल्या गेल्या होत्या. 1991 मध्ये पहिल्यांदाच एक प्रकारे बांगलादेशात स्वतंत्रपणे निवडणुका झाल्या आणि त्यावेळी हसीना यांच्या अवामी लीग पक्षाला बहुमत मिळाला आणि खालिदासिया यांचा विरोधी पक्ष सत्तेत आला.
शेख हसीना या त्या पर्यंत दोनवेळा मरता मरता वाचलेले आहेत पहिल्यांदा 1975 साली आणि दुसऱ्यांदा 2004 साली 1975 झाली त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या झाली होती. आणि त्यांना देशाबाहेर काढले होते आणि 2004 मध्ये त्यांच्यावर ग्रॅनाईट हल्ला झाला होता. त्यात त्या गंभीर देखील जखमी झाल्या होत्या. या हल्ल्यात एकूण 24 जणांचा मृत्यू झाला होता अशा प्रकारे त्यांनी आतापर्यंतचा आयुष्य काढलेले आहे.