ध्येयवेड्या रँचोचा दुर्देवी मृत्यू; स्वतः बनविलेलेले हेलिकॉप्टर उडविण्याचा प्रयत्न बेतला जीवावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हौसेला मोल नसत असं म्हणतात. मात्र, ती हौस पूर्ण करीत असताना ती आपल्या जीवावर बेतणार नाही ना याची तितकी काळजीही घ्यावी लागते. नाहीतर हौस करताना जीवही जातो. अशी घटना यवतमाळ येथील फुलसावंगी गावात घडली आहे. महागाव तालुक्यातील फुलसावंगी गावातील शेख इस्माईल शेख इब्राहिम या रँचोचा हेलीकॉप्टर उडवताना अपघाती मृत्यू झाला आहे. स्वतः बनविलेल्या हेलिकॉप्टरचे तो 15 ऑगस्टला प्रात्यक्षिक सादरीकरणही करणार होता. मात्र, त्याचे हे स्वप्न अधुरेच राहिले.

यवतमाळच्या महागाव तालुक्यातील फुलसावंगी गावातील 24 वर्षीय शेख इस्माईल शेख इब्राहिम या युवकाने स्वतः बनवलेल्या हेलिकॉप्टर उडविण्याचे प्रयत्न केला. यावेळी हेलीकॉप्टरच्या पंख्याचा चाचणीवेळी मार बसल्याने शेख इस्माईल शेख इब्राहिम याचा अपघाती मृत्यू झातयाची घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, फुलसावंगी या गावातील शेख इस्माईलने लहानपणी एक दिवस स्वतः पायलट बनून स्वत:च्या हेलीकॉप्टरने जगाची सफर करण्याचे स्वप्न रंगविले होते. पुढे मोठे झाल्यावर त्याने मेक इन इंडियाअंतर्गत मदत घेत स्वतःच मॅनुफॅक्चर केलेल्या पार्टद्वारे हेलिकॉप्टर तयार करणे सुरू केले.

हेलिकॉप्टर बनविण्यापुर्वी इस्माईलने वेल्डिंग आणि फेब्रिकेन पत्रकारागिराचा अनुभवही घेतला. तसेच घरच्या कारखान्यात अलमारी, कुलर अशी उपकरणे बनवली. आपल्या कुटुंबातील या व्यवसायातून वेळ काढून घरीच स्वदेशी बनावटीचे हेलिकॉप्टर बनविले. त्याला स्वताचे ‘मुन्ना हेलीकॉप्टर’ असे टोपण नावही दिले. स्वतः बनविलेल्या हेलिकॉप्टरचे तो 15 ऑगस्टला प्रात्यक्षिक सादरीकरणही करणार होता. मात्र, त्याचे हे स्वप्न अधुरेच राहिले.

त्याने चाचणी घेण्यासाठी काल रात्रीच्या सुमारास त्याने हेलिकॉप्टर सुरू केले, जमिनीवर सुरू केलेले इंजिन 750 अम्पियरवर फिरू लागले. यावेळी अचानक हेलिकॉप्टरचा मागचा फॅन तुटला, तुटलेला फॅन मुख्य फॅनला येऊन धडकला आणि तो फॅन इस्माईलच्या डोक्यात लागला. यात इस्माईल गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Leave a Comment