‘शेकाप’च्या जयंत पाटील यांच्यासह चार आमदारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रायगड प्रतिनिधी। विधानसभा निवडणूक शांततेत आणि भयमुक्तपणे पार पडाव्यात यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. जिल्ह्य़ांत आत्तापर्यंत १ हजार ६४६ जणांवर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४९ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यात चार आमदारांचाही समावेश आहे.

लोकसभा निवडणूक मतमोजणी प्रक्रिये दरम्यान मतमोजणी केंद्रावर बेकायदेशीरपणे घुसखोरी आणि पत्रकार मारहाणप्रकरणी दाखल गुन्ह्य़ाच्या अनुषंगाने शेकाप नेते आमदार जयंत पाटील यांच्यासह आमदार पंडित ऊर्फ सुभाष पाटील, धैर्यशील पाटील आणि अनिकेत तटकरे यांच्यावर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावली आहे.

दरम्यान विधानसभा निवडणूक राज्यात लागली असून निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणूक काळात गुन्हे घडवलेल्या व्यक्तीवर तसेच गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या व्यक्तीवर पोलिसामार्फत प्रतिबंधक कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्य़ात आत्तापर्यंत १ हजार ६४६ जणांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. यात चार आमदारांचाही समावेश आहे.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment