सातारा । सातारा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माण सोसायटी मतदारसंघातून शेखर गोरे हे विजयी झाले. शेखर गोरे आणि प्रतिस्पर्धी सत्ताधारी सहकार पॅनेलचे उमेदवार मनोज पोळ यांच्यात काट्याची लढाई झाली. दोन्ही उमेदवाराना समान मते पडल्यानंतर अखेर चिट्टी द्वारे शेखर गोरे यांना विजयी करण्यात आले. शेखर गोरे यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. कार्यकर्त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून शेखर गोरे हे सुद्धा भावनिक होऊन रडू लागले.
माण सोसायटी मतदारसंघातून शेखर गोरे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. शेखर गोरे यांना पराभूत करण्यासाठी त्यांचे बंधू व भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्याचा आरोप केला. रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावरही यावेळी शेखर गोरे यांनी त्यांनी जहरी टीका केली.
आज जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माण सोसायटी मतदारसंघातून शेखर गोरे विजयी झाल्याचे समजताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांनी शेखर गोरे याचे अभिनंदन केले. यावेळी काही कार्यकर्त्यांनाअश्रू अनावरही झाले. आपल्याप्रती कार्यकर्त्यांच्या मनात असलेले प्रेम पाहता शेक्सर गोरे हे देखील भावना विवष झाले.