पंचतारांकित हॉटेलने लावली शेखर रावजियानीच्या खिशाला कात्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । पंचतारांकित हॉटेलमध्ये जाणं हे थोडं खर्चिक असतं हे सर्वाना माहित आहे. मात्र बाहेर वाजवी भावात मिळणाऱ्या गोष्टींच्या वाढीव बिल चुकविताना आता बॉलीवूड सेलेब्रेटींना घाम फुटत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता राहुल बोसने पंचतारांकित हॉटेलमध्ये बिलावरून आलेला एक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यांना २ केळ्यांचे बिल ४४२ रुपये आल्याचे त्याने सांगितले होते. बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांना संगीत देणारी विशाल-शेखर यांमधील शेखर रवजियानी यांना देखील असाच एक अनुभव आला आहे. त्यांनी याबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर टाकत माहिती दिली आहे.

शेखर यांनी ट्विटरवर एक बिल शेअर केलं आहे. या बिलामध्ये त्याच्याकडून तीन अंड्यांसाठी तब्बल १६७२ रुपये आकारण्यात आल्याचं त्याने सांगितलं. त्याची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून त्यावर कमेंटचा पाऊस पडत आहे. शेखर रविजानीने या बिलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. अंड्यासाठी १६७२? हे जरा जास्त महागडे खाणे आहे,नाही? असे त्याने हा फोटो शेअर करताना लिहिले.

 

यापूर्वी राहुल बोसलाही असाच अनुभव आला होता. राहुलनेही बिलाचा फोटो शेअर केला होता. यात दोन केळींसाठी त्याला ४४२ रूपयांचे बिल आकारण्यात आले होते. हे प्रकरण इतके वाढले होते की, संबंधित हॉटेलला २५ हजारांचा दंड आकारण्यात आला होता. पण यानंतर फेडरेशन ऑफ हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष जीएस कोहलीने या अव्वाच्या सव्वा बिलाचे समर्थन केले होते. हॉटेलमध्ये कुठलीही गोष्ट स्वस्त मिळत नाही. हॉटेल केवळ पदार्थ खरेदी करून ग्राहकाला देत नाही तर सोबत सेवा, गुणवत्ता, कटलरी आदी गोष्टीही पुरवतो. त्यासाठी इतका पैसा मोजावा लागत असेल तर त्यात काहीही गैर नाही असे ते म्हणाले होते.

Leave a Comment