सातारा प्रतिनिधी | शेखर सिंह यांची सातारचे नवे जिल्हाधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली अाहे. सातारच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांची अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे येथे बदली करण्यात आली आहे.
भारतीय प्रशासकिय सेवेच्या १९ अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य शासनाने गुरुवारी काढले. यामध्ये गडचिरोली येथे कार्यरत असलेले शेखर सिंह यांची सातारचे नवे जिल्हाधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली. शेखर सिंह यांनी यापूर्वी सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणुन काम पाहिले आहे. त्यानंतर सिंह यांनी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी म्हणुन काम पाहिले.
शेखर सिंह यांच्या कारकिर्दित गडचिरोलीमध्ये उल्लेखनिय काम झाले. सिंह यांच्या कार्यकाळात सिंधुदुर्ग महापालिकेलासुद्धा स्वच्छ सर्वेक्षण पुरस्काराने गौरवण्यात आले होते.