इतका हाय होल्टेड ड्रामा…?; पती अभिनव कोहलीचा तमाशा पाहून श्वेता तिवारी भडकली

0
68
Shweta Tivari_Abhinav Kohli
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री श्वेता तिवारी ‘खतरों के खिलाडी’ या रिअ‍ॅलिटी शोच्या आगामी सिजनमध्ये स्पर्धक म्हणून दिसणार आहे. या शोसाठी श्वेता नुकतीच केपटाऊनला रवाना झाली. श्वेता केपटाऊनला गेली याचा फायदा घेत लगेच तिचा पती अभिनव कोहली याने सोशल मीडियावर जबरदस्त राडा घातला. एक व्हिडीओ शेअर करत, त्याने श्वेतावर अनेक गंभीर मुद्द्यांबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. इतकेच नव्हे तर आपल्या मुलासाठी चाईल्ड हेल्पलाईनसोबत संवाद साधण्याचा देखील प्रयत्न केला. हा व्हिडीओ पाहून श्वेता सुद्धा कन्फयुज्ड झाली. ‘बॉलिवूड बबल’ सोबत बोलताना तिने या सर्व प्रकाराबाबत चांगलाच संताप व्यक्त केला.

https://www.instagram.com/tv/COnBW26HiZw/?utm_source=ig_web_copy_link

या मुलाखती दरम्यान श्वेता म्हणाली, माझ्या केपटाऊन प्रवासाबद्दल अभिनवला सगळे माहित होते. रियांश कुठे आहे, हेही त्याला ठाऊक आहे. मी स्वत: त्याला फोन करून, मी केपटाऊनला जातेय आणि रियांश माझ्या कुटुंबासोबत आणि मुलगी पलकसोबत असल्याचे सांगितले होते. पण असे असूनही सोशल मीडियावर तो इतका हाय होल्टेड ड्रामा का करतोय, मला ठाऊक नाही. यामागे त्याचा काय उद्देश आहे, हेच मला कळत नाही. हायकोर्टाच्या आदेशानुसार, तो रोज अर्धा तास आपल्या मुलाशी फोनवर बोलू शकतो. आम्ही त्यास मनाई करू शकत नाही. याऊपरही आपला मुलगा कुठे आहे माहित नाही, असा दावा तो करतोय. रियांशला मी माझ्यासोबत केपटाऊनला आणणार होते. पण अभिनवने त्यास मनाई केली. त्यामुळे मी त्याची मुंबईतच व्यवस्था केली. मी माझ्या मुलाची पूर्ण काळजी घेतेय आणि अभिनव पिता आहे, जो आपल्या मुलाच्या पालन पोषणासाठी एक पैसाही देत नाही, अशा शब्दांत श्वेताने तिचा संताप व्यक्त केला.

https://www.instagram.com/tv/COlGqLFnuEU/?utm_source=ig_web_copy_link

श्वेता तिवारीचे अभिनव कोहली सोबत हे दुसरे लग्न आहे. मात्र या दोघांच्या नात्यातही काही अडचणी आहेत. त्यामुळे ते एकमेकांपासून विभक्त राहतात आणि मुलगा रियांशच्या कस्टडीसाठी केससुद्धा लढत आहेत. श्वेता केपटाऊनसाठी रवाना झाली असता अभिनव कोहलीने शेअर केलेल्या व्हिडिओत तो म्हणाला होता कि, श्वेता खतरों के खिलाडी मध्ये सहभागी होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला गेली आहे. काही दिवसांपूर्वी तिने मला फोन करून याबद्दल माझे मत विचारलं होतं. मात्र मी यासाठी नकार दिला होता. तरीसुद्धा ती गेली. मात्र आत्ता माझा मुलगा कुठे आहे? माहित नाही. तिने त्याला एका हॉटेलात ठेवले आहे. मी माझ्या मुलाचा फोटो घेऊन कालपासून प्रत्येक हॉटेलमध्ये फिरत आहे. मला अद्यापही काहीही माहिती मिळाली नाही, असा आरोप त्याने केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here