हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | रात्रीस खेळ चाले २’ मधील शेवंता या व्यक्तिरेखेने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. शेवंताच्या अदांवर संपूर्ण महाराष्ट्र भाळला होता. मालिका संपल्यापासून प्रेक्षक शेवंताला खूप मिस करत आहेत. पण आता त्याच शेवंताच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. पुन्हा एकदा टिव्ही वर तितक्याच मादक व्यक्तिरेखेत शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर पुनरागमन करणार आहे.
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर झी युवावरील आगामी मालिका ‘तुझं माझं जमतंय’ मध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पम्मी हि व्यक्तिरेखा या मालिकेत अपूर्वा साकारणार आहे. अपूर्वा पम्मी या भूमिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांना क्लीन बोल्ड करण्यासाठी सज्ज झाली आहे. विनोदी अशी या मालिकेची शैली असून या मालिकेला पम्मी ही ग्लॅमरचा तडक देणार आहे. हि मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
https://www.instagram.com/p/CGFZRXOjoAL/?utm_source=ig_web_copy_link
या मालिकेचा नुकचताच प्रोमो लाँच करण्यात आला. ‘रात्रीस खेळ चाले २’ ही मालिका संपल्यानंतरही शेवंताची नशा कायमच आहे. त्यामुळे आता चाहत्यांना शेवंता एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. ही मालिका प्रेक्षकांना झी युवा वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. ४ नोव्हेंवरपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता पाहता येणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’