चंदेरीदुनिया । फिटनेस फ्रिक म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी बॉलिवूड चित्रपटांमध्ये कमबॅक करत आहे. १३ वर्षांनंतर’निकम्मा’ चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतेय. या चित्रपटात ती मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणार आहे. ५ जून २०२० मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
शिल्पानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. यात तिने ‘निकम्मा’ या चित्रपटातून सेकंड इनिंग सुरू करत असल्याचे सांगितले आहे. मी आता १३ वर्षांच्या विश्रांतीला ब्रेक देणार आहे.
माझ्या सेकंड इनिंगमधल्या या पहिल्या चित्रपटासाठी मी फार उत्सुक आहे. माझ्या आगामी ‘ निकम्मा ‘ या चित्रपटाचे दिग्दर्शन सब्बीर खान करणार आहे . माझ्यासोबत या चित्रपटाच अभिमन्यू दसानी आणि शिर्ले सेतियाही दिसणार आहेत ,’ असं शिल्पानं म्हटलंय .
शिल्पानं २००७ मध्ये ‘ अपने ‘ या चित्रपटात काम केलं होतं . त्यानंतर ती बॉलिवूड मधून गायब झाली होती . असं असलं तरी ती छोट्या पडद्यावरील काही कार्यक्रमांमध्ये परीक्षकाची भूमिका साकारताना दिसली . तिचं स्वत : चं योगा अॅप आहे . याशिवाय यु ट्यूबवर तीचा फुड शो येतो . चित्रपटांमधून लांब असली तरी अशा अनेक अॅक्टिव्हीटींमध्ये शिल्पा सहभागी असते .