हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हीचा काल ४६वा वाढदिवस होता. या दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थातच तो सध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शिल्पा सध्या छोट्या पडद्यावरील डान्सिंग रिएलिटी शो सुपर डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये मुख्य परिक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पहायला मिळत आहे. यामुळे शिल्पा शेट्टीचा वाढदिवस तिच्या शोच्या कुटुंबासाठी खास होता. तिच्या वाढदिवसाचे दिमाखदार सेलिब्रेशन या शोच्या संपूर्ण क्रू सोबत स्पर्धक आणि परीक्षकांनी मिळून साजरे केले. दरम्यान या सेटवरील तिच्या बर्थ डे सेलिब्रेशनचे फोटो नुकतेच समोर आले आहेत.
सुपर डान्सर सीझन ४ मध्ये ह्या बर्थडे चे सेलिब्रेशन या वीकएंडला प्रेक्षकांसाठी प्रदर्शित होणार आहे. येत्या आगामी भागात ‘गुरु-शिष्य की अदलाबदली’ हे थीम आहे, त्यामुळे या भागात प्रेक्षक स्पर्धकांना आपल्या ‘नवीन’ गुरु समवेत वेगळी डान्स स्टाइल आजमावताना दिसणार आहेत.

शिवाय, शिल्पा शेट्टीचा वाढदिवस साजरा करण्याचीही पूर्ण तयारी दिसणार आहे. शूटिंग दरम्यान या सेलिब्रेशनबाबत समजल्यानंतर शिल्पाला आश्चर्याचा सुखद धक्काच लागला होता.
https://www.instagram.com/tv/CNe7yx4B8X8/?utm_source=ig_web_copy_link
शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर सध्या खूपच ऍक्टिव्ह आहे. त्यामुळे अनेकदा ती इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. बऱ्याचदा ती तिच्या फिटनेसमुळे चांगलीच चर्चेत येत असते. सोशल मीडियावर तिच्या फिटनेसचा लाखो दिवाने आहेत. तसेच सोशल मीडियावर शेअर केलेल्या तिच्या डान्स व्हिडीओचे देखील तिचे चाहते भरभरून कौतुक करत असतात.
https://www.instagram.com/p/CP3WWKNheup/?utm_source=ig_web_copy_link
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने ‘बाजीगर’ या चित्रपटातुन तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. पहिल्याच चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सर्वानी कौतुक केले होते. त्यानंतर तिने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले. धडकन, रिश्ते, गर्व, मैं खिलाडी तू अनाडी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
https://www.instagram.com/p/CP4ukvpBNTl/?utm_source=ig_web_copy_link
रुपेरी पडद्याप्रमाणे छोट्या पडद्यावरही शिल्पा अतिशय लोकप्रिय आहे. सुपर डान्सरमधील तिची सुपर से उपर बोलण्याची अदा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर शिल्पा पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहे.
https://www.instagram.com/p/CKRBd5Zp3Yx/?utm_source=ig_web_copy_link
लवकरच ती निकम्मा या आगामी चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दासानी आणि गायिका शर्ले सेतिया मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शिवाय शिल्पा शेट्टी, परेश रावल आणि मिजान जाफरीसोबत हंगामा २मध्येही दिसणार आहे.




