तुम्ही जर कल्याण, डोंबिवली, बदलापूर या मार्गांवरून प्रवास करणार तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. शिळफाटा ते कल्याण रस्ता बंद करण्यात येणार असून या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. निळजे रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी 5 ते 10 फेब्रुवारी दरम्यान शिळफाटा ते कल्याण रस्ता वाहतुकीसाठी बंद असणार आहे.
वाहतूक बंद कधी आणि कुठे?
या मार्गावरील वाहतूक 5 फेब्रुवारी रात्री 12:00 ते 10 फेब्रुवारी रात्री 12:00 पर्यंत बंद असेल पलावा जंक्शन जवळील निळजे रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठीया मार्गावरून अवजड वाहनांना पूर्णतः प्रवेश बंद असणार आहे. तर हलकी व मध्यम वाहने पर्यायी मार्ग वापरू शकतात.
शिळफाटा मार्गाचे पर्यायी मार्ग कोणते?
डोंबिवली, कल्याणकडून जाणारे वाहनचालक:
मोठागाव – माणकोली उड्डाणपुलाचा वापर करावा.
शिळफाटा मार्गे नवी मुंबई, पनवेलकडे जाणारे:
काटई नाका येथे डावे वळण घेऊन बदलापूर पाईपलाईन मार्गे तळोजा रस्त्याचा वापर करावा.
बदलापूर, अंबरनाथ, कर्जत मार्गे येणारे:
काटई नाक्यावर न जाता खोणी गावाकडे वळावे आणि तळोजा काँक्रीट रस्त्याने नवी मुंबई, पनवेलकडे जावे.
हलकी व मध्यम वाहने:
काटई गाव – काटई गाव कमान – लोढा, पलावा मार्गे प्रवास करू शकतात.
5 ते 10 फेब्रुवारी दरम्यान जड वाहने या मार्गावरून जाऊ शकणार नाहीत.वाहनचालकांनी दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा.
वाहतूक नियमनाचे पालन करावे. यामुळे प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन आधीच करणे आवश्यक आहे. असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.