राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे सरकारने घेतले मोठे निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे – फडणवीस सरकारची आज मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत नैसर्गिक आपत्तीतून नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शिंदे- फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान हे आता नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित केले जाणार आहे. या निर्णयामुळे अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्य सरकारकडून राज्यात अवकाळी पाऊस झाल्यास त्यातून होणाऱ्या नुकसानीची भरपाई देण्यात अडचण निर्माण होत होत्या. त्यामुळे यावर महत्वाचा निर्णय आज राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आला. यामध्ये अवकाळी पाऊस हा आता नैसर्गिक आपत्ती म्हणून गृहीत धरण्यास मंत्रिमंडळ बैठकीत शिकामोर्तब करण्यात आला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करणे आता शक्य होणार आहे.

मंत्रिमंडळात घेण्यात आलेले निर्णय :

1) शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित
2) ग्राहकांना स्वस्त दरात वाळू, रेती उपलब्ध होणार. सुधारित रेती धोरणास मान्यता. रेती लिलाव बंद
3) नागपूर मेट्रो रेल टप्पा- 2 प्रकल्पास सुधारित मान्यता. 43.80 किमीचा मेट्रो मार्ग उभारणार
4) देवनार डम्पिंग मैदानावर कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती प्रकल्पासाठी आरक्षणात फेरबदल
5) सेलर इन्स्टिट्यूट ‘सागर’ भारतीय नौदल, मुंबई या संस्थेस नाममात्र दराने भाडेपट्टा नुतनीकरण
6) महावितरण कंपनीस कर्ज घेण्यास शासन हमी.
7) अकृषि विद्यापीठातील शिक्षक समकक्ष पदांना सहावा व सातव्या वेतन आयोग लागू करण्यास मान्यता
8) नॅक, एनबीए मूल्यांकनासाठी मार्गदर्शन करण्याकरिता ‘परिस स्पर्श’ योजना