दहिवडी प्रतिनिधी | आकाश दडस
जिल्हा परिषद शाळा शिंदी बुद्रुक शाळेस जिल्हा परिषद सदस्य बाबासो पवार यांच्या सेस फंडातून देण्यात आलेल्या 43 इंच स्मार्ट टिव्हीचा देण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य बाबासो पवार, सरपंच ज्योती काळे यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी माजी पंचायत समिती सभापती वैशाली जगदाळे, माजी सरपंच धनाजी इंगळे, मुख्याध्यापक विठ्ठल खताळ, विवेक जगदाळे, दादासो नवले, प्रशांत काळे, विठ्ठल जाधव, नारायण इंगळे, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती शशिकांत इंगळे, पोलीस पाटील सागर खरात यांची उपस्थिती होती.
बाबासो पवार म्हणाले, अध्ययन अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर योग्य व विचारपूर्वक केल्यास अध्ययन अध्यापन नक्कीच आनंददायी होण्यास मदत होईल. तसेच या प्रसंगी उपस्थित असलेल्या यांनी तंत्रज्ञानाच्या वापराने विचाराची कक्षा रुंदवण्यास मदत होईल . तंत्रज्ञानाचा वापर शिक्षक व विदयार्थी दोहोंसाठी उपयुक्त होईल असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश मदने यांनी केले. सूत्रसंचालन नितीन काळे यांनी केले. आभार अनिता जगताप यांनी मानले.