…म्हणून जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी देशाची माफी मागत दिला पदाचा राजीनामा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टोकियो । जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. शिंजो आबे पंतप्रधान पदाचा राजीनामा देताना भावूक झाले. “दीर्घ आजारामुळे आपण पंतप्रधान पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मी जनतेची मनापासून माफी मागतो. कारण मी माझं कर्तव्य पार पाडण्यास सक्षम नाही. मी काही उद्दिष्ट निश्चित केली होती. ती पूर्ण होण्याआधीच राजीनामा द्यावा लागत असल्यानं मनाला वेदना होत आहेत,” अशा भावना आबे यांनी व्यक्त केल्या.

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे हे प्रकृतीच्या कारणांमुळे पदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू झाल्या होत्या. आबे यांनी प्रकृतीसंदर्भातील तक्रारीमुळे दोन वेळा रुग्णालायला भेट दिल्यानंतरच त्यांच्या राजीनाम्यासंदर्भातील चर्चांना उधाण आलं होतं. मागील बऱ्याच काळापासून आबे यांना आतड्याच्या सुजेने होणाऱ्या अल्सरचा त्रास आहे.

दरम्यान दिवसोंदिवस प्रकृती खालावत चालल्याने त्याचा परिणाम सरकारवर आणि सरकारी कामावर होऊ नये यासाठी अखेर आज आबे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचंही वृत्त होतं. आबे आणि मोदींच्या काळामध्ये भारत आणि जपानमधील संबंध अधिक बळकट झाल्याचे राजकीय तज्ज्ञ सांगतात. त्यामुळेच आता आबेंच्या जागी कोण येणार याकडे भारताचे लक्ष लागून राहिले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment