हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Shirdi To Tirupati Train । आंध्र प्रदेशातील तिरुमला पर्वतावर असलेले तिरुपती बालाजी मंदिर हे देशातील सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे. तिरुपती बालाजी (श्री वेंकटेश्वर स्वामी) हे भगवान विष्णूंचे रूप असून त्यांच्या दर्शनाला देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. आपल्या महाराष्ट्रातून सुद्धा बालाजीला जाणाऱ्या भक्तांची संख्या जास्त आहे. आता याच बालाजी भक्तांसाठी भारतीय रेल्वेने एक विशेष ट्रेन मंजूर केली आहे. हि ट्रेन अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी रेल्वे स्टेशनवरून धावेल. या विशेष ट्रेनमुळे साई दर्शन आणि बालाजी दर्शन घेणं सोप्प होणार आहे.
हजारो भाविकांना फायदा – Shirdi To Tirupati Train
साईबाबा हे सुद्धा आराध्य दैवत मानले जातात. अशावेळी शिर्डी ते तिरुपती एक्सप्रेस ट्रेन मुळे भाविकांना साईबाबा आणि बालाजी या दोन्ही देवतांचे दर्शन घेणं शक्य होणार आहे. खरं तर काही दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून शिर्डी वरून तिरुपती बालाजी साठी स्पेशल गाडी सुरू करण्यात आली होती. या स्पेशल गाडीला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आताही स्पेशल ट्रेन नियमित करण्यात आली आहे. तिरुपती ते शिर्डी दरम्यान दररोज हजारो भाविक प्रवास करतात. या भाविकांना दर्शन सोप्प जावं, त्यांचा प्रवास आरामदायी व्हावा हा विचार करून रेल्वे मंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
शिर्डी ते तिरुपती ट्रेनच्या (Shirdi To Tirupati Train) फेऱ्या वाढाव्यात यासाठी गेल्या काही वर्षांपासून राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पाठपुरावा सुरू केला होता. त्यांनी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांना पत्राद्वारे विनंती केली होती. आता या विनंतीनंतर आजपासून म्हणजेच 9 डिसेंबर साईनगर शिर्डी ते तिरुपती बालाजी हि साप्ताहिक ट्रेन सुरु करण्यात आली आहे. ही ट्रेन नियमित धावणार असून यामुळे तिरुपती ते शिर्डी असा प्रवास वेगवान होणार आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील भाविकांना या रेल्वेचा मोठा फायदा होणार आहे. एकाच रेल्वेच्या माध्यामातून दोन्ही मंदिराची दर्शन होणार असल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
कसे असेल वेळापत्रक ?
नियमित सेवा सुरू होण्यापूर्वी, ९ आणि १० डिसेंबर रोजी एक विशेष उद्घाटन सेवा (ट्रेन क्रमांक ०७४२५/०७४२६) चालवली जाईल. ट्रेन क्रमांक ०७४२५ ९ डिसेंबर रोजी सकाळी ११:१० वाजता तिरुपतीहून सुटेल, तर ट्रेन क्रमांक ०७४२६ हि १० डिसेंबर रोजी रात्री १०:२० वाजता शिर्डीहून सुटेल.
साप्ताहिक सेवा १४ डिसेंबरपासून सुरू होईल
ट्रेन क्रमांक १७४२५ दर रविवारी सकाळी ४ वाजता तिरुपतीहून सुटेल आणि ट्रेन क्रमांक १७४२६ दर सोमवारी संध्याकाळी ७:३५ वाजता साईनगर शिर्डीहून सुटेल. अधिकाऱ्यांनी सांगितले की, तिरुपती-शिर्डी एक्सप्रेस आंतरराज्यीय रेल्वे सेवा सुधारण्यासाठी एक मोठे पाऊल आहे, ज्यामुळे चांगली सुविधा, आध्यात्मिक सुविधा आणि प्रवाशांना आराम मिळेल.




