हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Shirdi To Tirupati Train। शिर्डीचे साईबाबा आणि तिरुपतीचा बालाजी हि २ देवस्थाने देशातील सर्वात प्रसिद्ध देवस्थाने मानली जातात. दररोज हजारो भाविक या दोन्ही देवस्थानांना भेट देतात आणि आशीर्वाद घेतात. आता मात्र ही २ देवस्थानेच रेल्वेने एकमेकांना जोडण्यात येणार आहेत. त्यासाठी भारतीय रेल्वेने एक स्पेशल साप्ताहिक ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ०७६३७/०७६३८ तिरुपती (TPTY) – साईनगर शिर्डी (SNSI) – तिरुपती (TPTY) असं या नव्या रेल्वेचं नाव आहे. हि ट्रेन कोणत्या दिवशी धावणार? कोणकोणत्या स्थानकांवर तिचा थांबा असेल याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात… .
कसे असेल वेळापत्रक – Shirdi To Tirupati Train
ट्रेन क्रमांक ०७६३७ तिरुपती – साईनगर शिर्डी ही गाडी ३ ऑगस्ट २०२५ ते २८ सप्टेंबर २०२५ पर्यंत दर रविवारी तिरुपतीहून पहाटे ४:०० वाजता सुटेल आणि एकूण ९ फेऱ्या करेल. ती सोमवारी सकाळी १०:४५ वाजता साईनगर शिर्डीला पोहोचेल. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक ०७६३८ साईनगर शिर्डी – तिरुपती साईनगर शिर्डी येथून दर सोमवारी १९:३५ वाजता सुटेल, ४ ऑगस्ट २०२५ ते २९ सप्टेंबर २०२५ पर्यंत एकूण ०९ सहलींसाठी धावेल. बुधवारी (तिसऱ्या दिवशी) 01:30 वाजता तिरुपतीला पोहोचेल.
कोणकोणत्या स्थानकांवर थांबा –
शिर्डी ते तिरुपती ट्रेन (Shirdi To Tirupati Train) रेनिगुंटा जंक्शन, गुडूर जंक्शन, नेल्लोर, ओंगोले, चिराळा, तेनाली जंक्शन, गुंटूर जंक्शन, सत्तेनापल्ले, पिदुगुरल्ला, नाडीकुडे जंक्शन, मिर्यालागुडा, नलगोंडा, पागिडीपल्ली, सिकंदराबाद, लिंगमपल्ली, विकदराबाद, भविराबाद जंक्शन, बिकराबाद जंक्शन, उडीदराबाद, उडीराबाद, परळी वैजनाथ, गंगाखेर, परभणी जंक्शन, सेलू, जालना, औरंगाबाद, नगरसोल, अंकाई, मनमाड जंक्शन, आणि कोपरगाव या रेल्वे स्थानकांवर थांबेल. (Shirdi To Tirupati Train)
रेल्वे डब्बाची अशी असेल रचना
या रेल्वेगाडीची रचना 2 वातानुकूलित द्वितीय श्रेणी डबे, 4 वातानुकूलित तृतीय श्रेणी डबे, 6 शयनयान, 4 सामान्य द्वितीय श्रेणी डबे, 1 द्वितीय आसन व्यवस्था असलेला गार्ड ब्रेक व्हॅन आणि 1 जनरेटर व्हॅन अशी असणार आहे. या विशेष रेल्वेगाडीच्या आरक्षणाची सुविधा 1 ऑगस्टपासून ऑनलाइन आणि बुकिंग तिकीट केंद्रावर तसंच, IRCTC च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल.




