वैशाली दरेकर या मशालीला रेसमध्ये आणत शिंदेंना धक्का देणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कल्याण म्हणजे श्रीकांत शिंदे…आणि श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) म्हणजे कल्याण.. कितीबी ताकद लावा निवडून येणार तर श्रीकांत शिंदेच…अगदी मतदानाच्या दिवसापर्यंत शिंदे समर्थकांकडून दाखवण्यात येणारा हा कॉन्फिडन्स… शिंदेंची दोन टर्मची खासदारकी…या काळात त्यांनी मतदारसंघात पाडलेला निधीचा पाऊस आणि केलेली विकासकामं यांचा लेखाजोखा पाहिला तर कल्याणची निवडणूक वन साईड होईल असा सर्वांचाच अंदाज होता. त्यातही ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर (Vaishali Darekar) यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तर शिंदेंच्या खासदारकीची हॅट्रिक फिक्स समजली जात होती…पण मतदान पार पडल्यावर लढत घासून झाली असून दरेकर शिंदेंना अनपेक्षित धक्का देऊ शकतात…मतदानानंतर कल्याणचा निकाल काय सांगतोय? शिंदेंच्या दोन टर्मच्या कामांकडे पाहून कल्याणकरांनी मतदान केलं की एकनिष्ठा पाहून दरेकरांच्या बाजूनं पारड जड केलंय. तेच पाहुयात

शिवसेनेत उभी फूट पाडणाऱ्या मुख्यमंत्री शिंदेंच्या मुलाची प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळे कल्याणमध्ये (Kalyan LoK Sabha 2024) धनुष्यबाणाचे की मशालीचे हात बळकट होणार यावर सगळा खेळ अवलंबून होता. मतदान झालं पण मतदानाचा आकडा कमालीचा घसरल्याने याचा मोठा फटका धनुष्यबाणाला बसू शकतो, असं मत इथले स्थानिक पत्रकार व्यक्त करतायत…संध्याकाळी पाच वाजेपर्यंत इथे 41.70 टक्के इतक्याच मतदानाची नोंद झाली…त्यातंही अंबरनाथ मधून सर्वात कमी तर कल्याण ग्रामीण मधून सर्वात जास्त मतदान झालं… आता या आकडेवारीची नीट फोड केली तर आपल्याला थेट निकालापर्यंत पोहचता येऊ शकतं. तर शहरी भागात धनुष्यबाण चालणार याचे सर्वाधिक चान्सेस होते. शिंदेंनीही त्यासाठी बराच जोर लावला होता. पण मतदान झालंच नाही त्यामुळं शिंदेंना जिथून होप्स होते तिथंच त्यांना खीळ बसली…कल्याण ग्रामीण मधून सर्वाधिक मतदान झालं असलं तरी इथं लढत निम्म्याला निम्मी अशी सुटणार असल्याने इथेही कल्याणचं चित्रं फारसं स्पष्ट दिसत नाही…उल्हासनगरमध्ये धनुष्यबाणाला मोठं लीड मिळेल पण कल्याण आणि डोंबिवलीच्या शहरी भागातून मशालीला झालेल्या मतदानातून ते भरून निघेल…थोडक्यात कल्याणचं मतदान घासून झालंय. मशाल किंवा धनुष्यबाण यांपैकी कुणीही सरशी मारलीच तरी देखील विजयाचं मार्जिन फारच कमी असेल, असा अंदाजही व्यक्त केला जातोय…

Kalyan Lok Sabha : Vaishali Darekar या मशालीला रेसमध्ये आणत, Shrikant Shinde यांना धक्का देणार

भाजपने आधीपासूनच कल्याणच्या जागेवर दावा केल्यामुळे महायुतीत बराच वाद झाला होता…कल्याणमधील भाजपच्या स्थानीक पदाधिकाऱ्यांनी धनुष्यबाणाचे काम करणार नाही, असा पवित्र घेतला…महायुतीतल्या या भांडणाचा फायदा दरेकरांना उचलण्याची संधी होती… काठावरची आणि भाजपकडे झुकणारी मतं आपल्याकडे शिफ्ट करून घेण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्नही केले…तर तुलनेने इथून महाविकास आघाडीने मशालीच्या बाजूने पूर्ण ताकद लावली होती…या सगळ्या गोष्टी मतदानाच्या दिवशीही दरेकरांच्या पथ्यावर पडताना दिसल्या…थोडक्यात काय तर श्रीकांत शिंदेंना कल्याण आरामात सुटेल.. असं जे काही वाटलं होतं त्याच्या अगदी विरोधी चित्रं मतदानानंतर कल्याणमध्ये दिसतंय… प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही कल्याणमध्ये बराच गोंधळ पाहायला मिळाला… ईव्हीएम मशीन बंद पडल्या…मुद्दामहून काही विशिष्ट समुदायाचा मतदान केंद्रावर खोळंबा करण्यात आला… तर कुठे बोगस मतदान होत असल्याच्या तक्रारीही झाल्या. याचा किती इम्पॅक्ट कलर वर होईल, हे चार जूनलाच स्पष्ट होईल…

श्रीकांत शिंदे यांच्या दोन्ही टर्म अत्यंत चांगल्या गेल्या… अनेक विकासकामं त्यांनी मतदारसंघात केल्याने आपलं एक स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण करण्यात त्यांना यश आलं होतं…त्यातही स्वतः शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक प्रकारचा निधी श्रीकांत शिंदेंनी मतदारसंघासाठी आणला…त्यामुळे कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंची इमेज तशी चांगली राहिली…पण खरं गणित बिघडलं ते एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर… शिंदे पितापुत्रांनी पुढाकर घेऊन ठाकरेंवर अनेक शाब्दिक वार चढवले… जशास तसं उत्तर दिलं…याचा परिणाम असा झाला की मुंबईत ठाकरेंच्या बाजूने सहानुभूतीची मोठी लाट तयार होऊन शिंदे पितापुत्र याचे सॉफ्ट टारगेट बनले…त्यामुळे श्रीकांत शिंदे कामाचा माणूस असला तरी एकनिष्ठ नाहीये… या एकाच गोष्टीसाठी श्रीकांत शिंदेंची खासदारकी धोक्यात येऊ शकते… त्यात कल्याणमध्ये एवढं काम करूनही भाजपने तिकीट अडवून धरल्यामुळे याचाही चुकीचा मेसेज मतदारसंघात गेला असल्याची शक्यता ना करता येत नाही…उद्धव ठाकरेंनी त्यात मोठी खेळी करत प्रस्थापित चेहरा शिंदेंच्या विरोधात न देता एक सामान्य माजी नगरसेविका महिलेला उमेदवारी देऊन शिंदे विरुद्ध शिवसैनिक असं मतदानाचं नरेटीव सेट केलं त्याचाही मोठा फटका शिंदेंना मतदानाच्या दिवशी बसला असू शकतो…

कल्याण मध्ये महायुती स्ट्रोंग होती… श्रीकांत शिंदे यांनी आपल्या दहा वर्षांतील विकास कामाचं कॅसेट प्रचारात चांगलं वाजवलं होतं…भाजप आणि राज ठाकरे यांनीही शिंदेंसाठी सभा घेतल्याने मनसैनिकांचं लाखभर मतांचं इंजिन शिंदेंच्या पाठीशी लागलं… पण ठाकरेंच्या बाजूने असणाऱ्या सहानुभूतीच्या लाटेपुढे मतदानाच्या दिवशी काहीच टिकू शकलं नाही, असंही मत आता समीर येतंय… त्यामुळे कल्याणची लढत घासून झाली असली तरी धनुष्यबाण सुटण्याऐवजी मशालीच्या प्रकाशाने कल्याण उजळलेले दिसेल, अशीही चर्चा कल्याणमध्ये आहे… त्यामुळे चार तारखेचा निकालात कल्याणकर कुठल्या शिवसेनेला कौल देतील? शिंदेंच्या की ठाकरेंच्या? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.