Shiroda Beach Tourism : रशियन पर्यटकांनाही भुरळ घालतोय कोकणातील हा बीच; डिसेंबरमध्ये असते मोठी गर्दी

Shiroda Beach Tourism
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Shiroda Beach Tourism । डिसेंबर महिना म्हंटल कि सुट्यांचा महिना… वेगवगळ्या कंपन्यात काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांचा वर्षभराच्या सुट्ट्या शिल्लक असल्याने फिरण्याचा प्लॅन तर ते आखतातच.. थंडीच्या दिवसांत ट्रिप काढण्याचा आणखी एक फायदा म्हणजे निसर्गाचा मनमुराद आनंद घेता येतो. सकासकाळची धुक्याची चादर, अन त्यातून वाट काढत केलेला प्रवास यांचं फील जरा वेगळंच असते. त्यातहि या दिवसात कोकणात जाणाऱ्यांची संख्याही तितकीच जास्त असते… कारण म्हणजे ख्रिसमस नाताळ आणि नव्या वर्षाची पार्टी… तुम्ही सुद्धा यंदाच्या डिसेंबर महिन्यात कुठेतरी कोकणात फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा एका बीच बद्दल सांगणार आहोत ज्याची भूरळ फक्त भारतीयांनाच नव्हे तर अगदी रशियन पर्यटकांनाही आहे.

जलक्रीडांचा मनसोक्त अनुभव- Shiroda Beach Tourism

कोकणातील सर्वात स्वच्छ आणि शांत समुद्रकिनाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरोडा बीचवर सध्या पर्यटकांची लक्षणीय वाढ पाहायला मिळत आहे. निसर्गाच्या विविधतेत हरवून जाऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी हा बीच सर्वात बेस्ट डेस्टिनेशन ठरू शकतो. शिरोडा बीचवर जलक्रीडांचा अनुभव घेतला जाऊ शकतो. इथे बोटिंग, कायकिंग, आणि पॅडल बोटिंग यांसारख्या जलक्रीडांचा आनंद घेताना मोठ्या प्रमाणावर पर्यटक दिसतात. इथले स्वच्छ पाणी, समुद्राच्या लाटा आणि शांत वातावरण पर्यटकांना आकर्षित करतात. इतर प्रसिद्ध बीचच्या तुलनेत इथे गर्दी कमी असते. खाण्यापिण्याची आणि राहण्याची सोय सुद्धा याठिकाणी उत्तम आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मते, शिरोडा बीचवरील वाढत्या पर्यटकांमुळे परिसरातील होमस्टे, रिसॉर्ट्स आणि स्थानिक दुकानदारांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

कोकणी पदार्थांवर मारा ताव –

शिरोडा बीच कोकणी संस्कृतीचे एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. इथल्या लोकांच्या परंपरा, कला आणि परंपरेची झलक इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला दिसते. इथे ताज्या मासळीचे पदार्थ, ओला नारळ घालून बनवलेल्या मसालेदार भाज्या, सोलकढी इत्यादी पदार्थ अत्यंत लोकप्रिय आहेत. कोकणी कढी, माशाचे रेजी, भात या सर्वांचा स्वाद इथे आनंदाने घेतला जातो. नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा कालावधी शिरोडा बीचवर जाण्यासाठी सर्वात बेस्ट मानला जातो. Shiroda Beach Tourism

शिरोडा बीचला कसे जावे?

रस्त्याने (By Road)

शिरोडा बीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात आहे.

वेंगुर्ला शहरापासून अंतर : सुमारे 12–14 किमी

सावंतवाडीहून : 25–30 किमी

कोल्हापूर–गोवा महामार्ग (NH 66) वरून वेंगुर्ला व नंतर शिरोडा गावाकडे जाणारा मार्ग सोयीस्कर आहे.

मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, गोवा येथून अनेक खासगी गाड्या व पर्यटन बसेस थेट किंवा वेंगुर्ल्यापर्यंत उपलब्ध आहेत.

रेल्वेने (By Train)

सर्वात जवळची रेल्वे स्थानके :

सावंतवाडी रोड (SWV) – सुमारे 25–28 किमी

कुडाळ (KUDL) – सुमारे 35–40 किमी

दोन्ही स्थानकांवरून टॅक्सी, ऑटो किंवा बसने शिरोडा बीचपर्यंत सहज पोहोचता येते.