शिष्या स्कुल तर्फे वार्षिक कला प्रदर्शन

0
38
Shishya School
Shishya School
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
पुणे | वाकड येथील द शिष्या स्कुल तर्फे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रदर्शनाचे उद्घाटन मिटसॉटचे प्रकल्प संचालक डॉ.मिलिंद पांडे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी शिष्या स्कुलचे संचालक सिध्दार्थ माहेश्‍वरीजी, मुख्याध्यापिका प्रियम गुंजाल,वरिष्ठ समन्वयक सौ.चॅटर्जी व इरा वाधवा आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रदर्शनाकरिता भारतातील वेगवेगळी राज्ये आणि त्यांची संस्कृती ही संकल्पना होती. शिष्या स्कुल हे इंटीग्रेटेड स्कुल असून यामध्ये सामान्य विद्यार्थ्यांसोबत विशेष मुले देखील शिक्षण घेतात.
याप्रसंगी बोलताना डॉ.मिलिंद पांडे म्हणाले की,जीवनात शिक्षणाला अत्यंत महत्त्व आहे. अब्दुल कलाम यांनी म्हटल्याप्रमाणे जर गरीबांपर्यंत शिक्षण पोहचत नसेल तर शिक्षणाला गरीबांपर्यंत पोहचविले पाहिजे आणि यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्नशील राहिले पाहिजे.या शाळेतील दिव्यांग व सामान्य मुलांना एकत्रित शिक्षण देण्याची संकल्पना खूपच वाखणण्याजोगी आहे,यामुळे दिव्यांग मुलांचा आत्मविश्‍वास वाढून त्यांना सामान्य मुलांप्रमाणे समाजात वावरण्यास मदत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here