हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्याकडून अनेकवेळा वादग्रस्त विधाने वापरली गेलेली आहेत. आज पुन्हा त्यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. “हिंदुस्थान हा एक अब्ज 23 कोटी लोकांचा देश आहे. दीर्घ काळ परक्यांचा मार खात, दास्यत्व स्वीकारत, खरकटं उष्टं खात आलेला आहे. निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे” असे वक्तव्य संभाजी भिडे केले आहे.
दसरा हा सण सर्वजण साजरे कृतज्ञता. या दिवशी सर्वजण एकमेकांना शुभेच्छाही देतात. या दिवशी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे दुर्गामाता दौड काढली जाते. सांगलीतही दुर्गामाता दौड काढण्यात आली. या दाऊदच्या समारोपप्रसंगी संभाजी भिडेंनी वादग्रस्त विधान केले आहे. यावेळी ते म्हणाले की, “आपल्या पेक्षा प्रत्येक गोष्टीत चीन पुढे आहे. जो आपला कट्टर दुश्मन, वैरी, मारेकरी, गनीम, शत्रू आहे, आपला निर्लज्जपणात क्रमांक एक आहे.
“आपला-परका कोण मित्र कोण हे कळत नाही. या देशात कसले सरकार आहे. हा देश जगाचा बाप बनावा यासाठी मोठी मोहीम छत्रपती शिवाजी महाराज यांनी हाती घेतली होती. ती मोहीम पार पाडण्यासाठी आपण मोहीम करतो. कोरोना येतो, हा थोतांड आहे. कोरोना हा काल्पनिक आहे. चीनने तुम्हाला आणि आम्हाला पालथं पाडण्यासाठी केलेली बदमाशी आहे.