Wednesday, June 7, 2023

कर्नाटक सरकारच्या पुतळ्याचे शिवसैनिकांनी केले दहन

सांगली | कर्नाटकातील बेंगलुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्‍वारूढ पुतळ्यांवर गुंडप्रवृत्तीच्या लोकांनी शाई फेकून अनादर केला. परंतु कर्नाटकाचे मुख्यमंत्र्यांनी यागोष्टीकडे साधेपणाने पाहून दुर्लक्ष केले. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे दैवत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचे दहन सांगली जिल्हा, मिरज तालुक्यातील शिवसैनिकांनी म्हैसाळ येथील कर्नाटक सीमेवर जवळ केले.

कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरादार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुंचे आराध्य दैवत आहे. या दैवताचा अनाधर महाराष्ट्र कधीही खपवून घेणार नाही. कर्नाटक मुख्यमंत्र्याना सांगायचे आहे. तुमची भावना ही अफलखान सारखी आहे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करता. अफजलखान हा कर्नाटकातून आला होता. जर तुम्ही त्या अवलादीचे असाल तर तुमचा आम्ही कोथळा काढल्या शिवाय राहणार नाही असा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला.

यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख शंभोराज काटकर, तालुका प्रमुख विशालसिंग राजपुत, महादेव मगदूम, किरणसिंग राजपुत, मिरज विधानक्षेत्र प्रमुख तानाजी सातपुते, शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे, जिल्हा उपसंघटक सुरज पाटील, शहर प्रमुख विजय शिंदे, गजानन मोरे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.