भाजप नेते किरीट सोमय्यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांची दगडफेक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून आज वाशीम जिल्ह्याचा दौरा केला जात आहे. या दौऱ्यावेळी त्यांच्याकडून शिवसेनेवर टीका करण्यात आल्याने आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या ताफयातील गाडीवर शाही फेकून दगडफेक केली. यावेळी एकच गोंधळ उडाला.

भाजपनेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार भावना गवळी यांचा घोटाळा उघडकीस आणणार तसेच नार्वेकर यांनी समुद्र किनाऱ्यावर बंगला बांधला असून लवकरच हा बंगला मी जमीनदोस्त करणार असल्याची टीका केली आहे. यावरून आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या ताफयातील गाडीवर अचानकपणे दगडफेक करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली.

 

भाजपनेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून सध्या शिवसेनेवर टीका केली जात आहे. दरम्यान ते आज वाशीम येथे रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी एका कार्यक्रमात मिलिंद नार्वेकर, अनिल परब, भावना गवळी, यशवंत जाधव या चौघावर आता ईडी, पोलीस कारवाई करणार असल्याचेही म्हणाले. त्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या ताफयातील गाडीवर अचानकपणे दगडफेक केली.

Leave a Comment