एकाच वर्षात राम मंदिराचा निकाल, मुख्यमंत्रीपद ही शिवनेरीच्या मातीची कमाल आहे- उद्धव ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांशी संवाद साधला. नेते, उपनेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. शिवनेरीवरची माती घेऊन राम जन्मभूमीला गेलो आणि एका वर्षात राम मंदिराचा निकाल आला. आपल्याकडे मुख्यमंत्रीपद आलं. शिवनेरीच्या मातीचीही कमाल असल्याची भावना यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना म्हणाले, “शिवसैनिक कधीही संकटाला घाबरणार नाही डगमगणार नाही. घट्ट पाय रोवून उभा राहतो तो शिवसैनिक आहे आणि हा मर्द शिवसैनिक माझ्यासोबत आहे. शिवसेनेने आपली विचारधारा बिलकुल बदललेली नाही. मी शिवनेरीला आणि एकविरा देवीच्या दर्शनाला गेलो. शिवनेरीवरची माती घेऊन राम जन्मभूमीला गेलो आणि एका वर्षात राम मंदिराचा निकाल आला. आपल्याकडे मुख्यमंत्रीपद आलं. शिवनेरीच्या मातीचीही कमाल आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री झाल्यामुळे आपल्यासोबत संपर्क जरी कमी झाला असला तरी मी अंतर कमी पडू देणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं.

”शिवसेनाप्रमुख म्हणायचे की, माझ्याभोवती हे शिवसैनिकांचं कवच आहे. शिवसैनिकांचं कवच पण आहे तसंच त्यांचा वचकसुद्धा आहे. आपल्या सोबत राजकारण करण्याचा जो प्रयत्न झाला ते मोडीत काढायचे त्यामुळे मी आज येथे मुख्यमंत्री म्हणून बसलो आहे. अन्याय सहन करू नका आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी म्हणून शिवसेनेचा जन्म झाला. अन्याय सहन करू नका आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी म्हणून शिवसेनेचा जन्म झाला,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment