हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | यावर्षी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकार विजयी झालेले आहे. आणि यातील भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर या अजूनही फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? याची सगळेजण वाट पाहत आहेत. लवकरच हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. आणि या दिवशी दिवाळी अधिवेशनाच्या आधीच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती महायुतीच्या नेत्यांनी सांगितलेले आहे. या मंत्रिमंडळात शिवसेनेचे 13 नेते मंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
या राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी शिवसेनेचे काही मागील मंत्री आणि नवीन मंत्र्यांसाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांच्या नावाबद्दल दिल्लीमध्ये चर्चा देखील करण्यात आलेली आहे. यामध्ये हाती आलेल्या माहितीनुसार शिवसेनेला यावर्षी 13 मंत्री पद मिळणार असल्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होणारच आहेत. यामध्ये शिंदे गटातील गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, शंभूराज देसाई, तानाजी सावंत, दीपक केसरकर या मंत्र्यांचा समावेश असणार आहे. तर भरत गोगवले यांचा आता फडणीस सरकारच्या मंत्रिमंडळात गोगावले यांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
दिल्लीत चर्चा झालेल्या मंत्र्याची नावे
दिल्लीत जी चर्चा करण्यात आली त्यात गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, शंभूराजे देसाई, तानाजी सावंत, दीपक केसरकर, भरतशेठ गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे, आशिष जैस्वाल या मंत्र्यांचा समावेश होता.