मिरजेच्या शिवसेना शहर प्रमुखाला चोरीच्या प्रकरणात 4 दिवस पोलिस कोठडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली |  मिरज येथील शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे याला चोरीच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. येथील रेल्वे ठेकेदाराचा कोरा धनादेश व आरटीजीएस पावती चोरून ठेकेदाराच्या खात्यातून आपल्या खात्यात 20 लाख रुपये वर्ग करून घेतले. तसेच 15 लाख रुपये काढून चोरी केल्याप्रकरणी शिवसेना मिरज शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे यांचा अटकपूर्व जामिन फेटाळल्यानंतर त्याला महात्मा गांधी चौक पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयात त्याला हजर केले असता 4 दिवस पोलिस कोठडी देण्यात आली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मधुकुमार (रा. माहेश्‍वरी निवास, सांगली) यांनी याबाबत सहा महिन्यापूर्वी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर चंद्रकांत मैगुरे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने शुक्रवारी मैगुरे यांना अटक करण्यात आली. मधुकुमार हे रेल्वेचे ठेकेदार आहेत. त्यांच्या कंपनीचे मिरजेतील बँक ऑफ इंडिया बँकेत खाते आहे.

मधुकुमार यांची सही असलेला कोरा धनादेश व एक आरटीजीएस पावती काही महिन्यापूर्वी चोरीला गेली होती. चोरलेला कोरा धनादेश व आरटीजीएस पावतीचा वापर करुन कंपनीच्या खात्यातील 20 लाख रुपये दि. 26 आक्टोबर 2020 रोजी चंद्रकांत मैगुरे यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली होती. जमा झालेल्या रकमेपैकी 15 लाख रुपये मैगुरे यांनी काढून घेतल्याची तक्रार मधुकुमार यांनी पोलिसात दिली होती. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

Leave a Comment