हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील खड्ड्यांवरून मनसे व शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलाच वाद रंगला आहे. दरम्यान आवाज शिवसेनेचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी मनसेला इशारा दिला आहे. “खड्ड्यात गेलेल्या पक्षाने आम्हाला खड्ड्यात घालण्याची भाषा करू नये. तशी भाषा कराल तर याद राखा, असा इशारा म्हात्रे यांनी दिला आहे.
मुंबईत निर्माण झालेल्या खड्ड्यांच्या साम्राज्यावरून शिवसेनेचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनसेवर जोरदार टीका केली. यावेळी म्हात्रे म्हणाले की,” 2015 मध्ये मनसेचे 9 नगरसेवक निवडून आले होते. त्यांची संख्या कमी होत गेली. त्यामुळे मनसे हाच खड्ड्यात गेलेला पक्ष आहे. त्याने कोणाला खड्ड्यात घालण्याची भाषा करु नये.
शिवसेनेचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे व मनसे पदाधिकारी यांच्यामध्ये आता खड्ड्यांवरून जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. या दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांचा वाद आता वरिष्टांपर्यंत पोचल्यास पुढे मोठा वाद होणार नाही ना? अशा शंका व्यक्त केली जात आहे.