हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे तिवसा शहर प्रमुख अमोल पाटील यांची डोळ्यात मिरचीपूड टाकून हत्या केल्याची घटना घडली आहे . रात्री १०:१५ ला हि घटना घडली असून या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तिवसा शहरातील आशीर्वाद वाईन बारसमोर हि घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी कि अमोल पाटील मित्रासोबत शनिवारी रात्री आशीर्वाद बारमध्ये गेला होता. मात्र बार बंद झाल्याने दोघंही बारसमोर बसले होते. यावेळी दोन ते तीन जणांनी अमोल पाटीलच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली. त्यानंतर त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याला जागीच ठार केले. राष्ट्रीय महामार्गावर वर्दळीच्या ठिकाणी राजकीय पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याने जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान पोलिसांनी चार आरोपींना वर्धा जिल्ह्यातील तळेगाव श्यामजीपंत येथून अटक केली तर एक आरोपी पसार असल्याची माहिती पोलिस निरीक्षण रिता उईके यांनी दिली,अटक केलेल्या आरोपी मध्ये संदीप रामदास ढोबाळे वय 42 वर्षे, प्रवीण रामदास ढोबाळे, प्रवीण उर्फ अविनाश एकनाथ पांडे वय 30 वर्ष, रूपेश घागरे वय 22 वर्ष राहणार सर्व तिवसा तर एक जण पसार आहेत, आरोपी विरुद्ध 302,143,147,148,149, 120 (ब),34 नुसार गुन्हे दाखल केले आहे