विधान परिषदेच्या उमेदवारीतून रामदास कदमांचा पत्ता कट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे नेते तथा आमदार रामदास कदम यांच्या ऑडिओ क्लिपमुळे ते अडचणीत आले आहेत. दरम्यान त्यानंतर आता पुन्हा त्यांना अजून एक धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या सात जागांसाठी होणाऱ्या निवडणूकीच्या यादीतून रामदास कदम यांचे नाव वगळण्यात आलेले आहे. पक्षाकडून त्यांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली नाही.

काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर दापोलीतील साई रिसॉर्ट बांधणीत अनियमितता केल्याचा आरोप होता. सोमय्यांच्या या आरोपामागे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचाच हात असल्याचा आरोप करण्यात आला. अनिल परब यांच्या सीआरझेड झोनमधील रिसॉर्टची माहिती ही रामदास कदम यांनीच पुरवल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली.

दरम्यान शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात त्यांना प्रवेश मिळणार नाही, अशी चर्चा असताना कदम यांनी मुख्यमंत्र्यांना सहा पानी पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रकृती ठीक नसल्यामुळे मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आमदार रामदास कदम यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे वाटत होते. ती आता खरी ठरली आहे. येत्या डिसेंबर महिन्यात विधान परिषदेच्या आमदारांच्या निवडीची निवडणूक होणार आहे. दि. 10 रोजी मतदान होणार असून दि. 14 रोजी मतमोजणी केली जाणार आहे. विधानपरिषदेच्या सात जागांसाठी हि निवडणूक होणार आहे.

Leave a Comment