हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून भाजप नेत्यांकडून सरकारमधील नेत्यांवर टीका केली जात आहे. दरम्यान आज शिवसेनेचे नेते तथा परिवहनमंत्री अनिल परब यांनी भाजपवर निशाणा साधला. “राज्य सरकार कामगारांच्यासोबत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यामुळे कामगारांनी कामावर यावे. अनेक कामगारांना कामावर यायचे आहे. त्यांना संरक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मात्र, भाजपचे कार्यकर्ते कामगारांना अडवण्याचे काम करत आहेत. राजकीय आंदोलन करून कर्मचा-यांचा प्रश्न सुटणार नाही, अशी टीका परब यांनी केली आहे.
परिवहनमंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यात जी काही एसटी कर्मचाऱ्यांची आंदोलने चालली आहेत. त्याबाबत राज्य सरकारकडून एसटी आक्रमगारांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली जात आहे. कामगारांच्या विविध मागण्यांबाबत तोडगा काढण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. काही कामगार अजूनही कामावर येण्यास तयार झाले आहेत. मात्र, कामावर येणाऱ्या कामगारांनी अडवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. तो त्यांनी करू नये. यासंदर्भात पोलीस आणि एसटी अधिका-यांशी चर्चा झालेली आहे.
एसटी कामगारांनो माझी विंनती आहे. की, आम्ही, मुख्यमंत्री आपल्यासोबत आहोत. त्यामुळे कामावर यावे. आपलय मागण्यानावर लवकरच तोडगा काढू. तोपर्यंत आपला तोल जावू देवू नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत. आंदोलनात वेळ वाया घालवू नये. जो अहवाल येईल त्याचे बंधन आम्हांवर असेल, असे परब यांनी सांगितले आहे.