मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ तुम्ही विकत घेतले आहे का? ; अरविंद सावंत यांचा अदानींना सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा मिळाल्यानंतर विमानतळावर अदानी एअरपोर्ट असे नामफलक लावण्यात आले. यावरून शिवसेनेचे नेते, खासदार अरविंद सावंत यांनी अदानी समूहावर निशाणा साधला आहे. “विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ आहे. त्यांनी ‘अदानी विमानतळ’ लिहिले. तुम्ही ते विकत घेतले आहे का?, असा सवाल सावंत यांनी केला आहे.

याबाबत सावंत यांनी टीका करताना म्हंटल आहे की, “मुंबईतील विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ आहे. त्यांनी ‘अदानी विमानतळ’ लिहिले. तुम्ही ते विकत घेतले आहे का? शिवाजी महाराज देशाची शान आहेत. त्यांनी तोडफोड केली आहे. 2-3 लोक कायदे पाळत नाहीत.”

दरम्यान, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेत अदानी समूहाने लावलेला फलक फोडून टाकला. शिवसेनेकडून आक्रमक पावित्रा घेतला गेल्यानंतर अदानी समूहाकडून याबाबत खुलासाही करण्यात आला आहे. मात्र, पुन्हा एकदा विमानतळाच्या नामांतरावरून अदानी समूहावर टीका होऊ लागली आहे.

Leave a Comment