“अलिबागचे जावई आहात ना तर मग जावयासारखे या, अन्यथा…”; शिवसेना नेत्याचा सोमय्यांना इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते किरीट सोमय्या आज सकाळी रायगड जिल्ह्यातील कोर्लाई गावास रवाना झाले. त्यांच्याकडून त्या ठिकाणी जाऊन तिथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि माजी मंत्री रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांच्या जमिनीची पाहणी केली जाणार आहे. दरम्यान सोमय्यांना शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी गंभीर इशारा दिला आहे. “सोमय्या हे अलिबागचे जावई आहेत, त्यांनी जावयासारखे यावे. उन्माद करू नये अन्यथा शिवसेना योग्य उत्तर देईल,” असा इशारा दिला आहे.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून अलिबाग तसेच रायगड जिल्ह्यातील कोर्लाई गावास भेट दिली जाणार आहे. तत्पूर्वी शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सोमय्या हे अलिबागचे जावई आहेत, त्यांनी जावयासारखे यावे. उन्माद करू नये अन्यथा शिवसेना योग्य उत्तर देईल,” असा इशारा शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी दिला आहे. कोर्लई गावच्या सरपंचानी कालच वस्तुस्थिती सांगितली आहे. त्यामुळे सोमय्यांनी उगाच खोटेनाटे आरोप करू नयेत असही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सोमय्या यांनी पेन येथील भाजप आमदाराच्या घरास भेट दिली. यावेळी त्याचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.किरीट सोमय्या यांच्याकडून आज कोर्लई येथील रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्या जागेवरील १९ बंगल्यांचा शोध घेण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयास भेट देणार आहेत. त्यानंतर रेवदंडा पोलीस ठाण्यात जाऊन यापूर्वी केलेल्या तक्रारींबाबत पोलीस प्रशासनाकडे विचारणा करणार आहेत.

Leave a Comment