व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव चिपळूणमध्येच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतरही आता महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार असल्याचे सांगितले जात आहे. या दरम्यान आता एकनाथ शिंदे गटाकडून आणखी एक मोठा ठाकरे सरकारला देण्यात आला असल्याचे बोलले जात होते. आमदार भास्कर जाधव एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळण्याची दाट शक्यता आहे. कालपासून भास्कर जाधव यांचा फोन नॉट रिचेबल लागत असल्यामुळे ते गुवाहाटीला गेल्याची चर्चा केली जात होती. मात्र, ते सध्या चिपळूणमध्ये असल्याची माहिती त्याच्या स्वीय सहाय्यकांनी दिली आहे.

आतापर्यंत शिंदे यांनी राज्यातील आठ ते नऊ जिल्ह्यांतील शिवसेनेचे आमदार गळाला लावले होते. मात्र, कालपर्यंत मुंबई आणि तळकोकणातील आमदार शिवसेनेच्या गोटात होते. परंतु, काल मुंबईतील मंगेश कुडाळकर आणि सदा सरवणकर गुवाहाटीत जाऊन एकनाथ शिंदे गटात सामील झाले होते. त्यानंतर आज भास्कर जाधवही नॉट रिचेबल झाल्याने त्यांच्याबाबत ते शिंदे गटात गेल्याचे बोलले जात होते. मात्र, ते गुवाहाटीला गेले नसून ते चिपळूणमध्ये असल्याची माहिती त्यांचे स्वीय सहाय्यकांची दिली आहे.

शिंदे यांनी आपले बंड आणखी तीव्र केले आहे. शिवसेनेच्या आमदारांसह शिंदे सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. शिवसेनेचे निम्म्याहून अधिक मंत्री शिंदे गटात गेले आहेत. दरम्यान त्यांच्याकडून आता भाजपशी हातमिळवणी केली जाणार असल्याने राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.