शिवसेनेचा आमदार बैलाचा औत धरून भात शेतात लागणीत व्यस्त, सोशल मिडियावर व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जावली | जावली तालुक्याचे शिवसेनेचे माजी आमदार सध्या काय करतात हा प्रश्न उत्सुकतेने विचारला जाऊ लागला आहे. कारण सध्या त्यांचा एक फोटो सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ते शेतात बैलाचा औत धरलेले दिसत आहेत. तर जावलीचे माजी आमदार सदाभाऊ सपकाळ सध्या आपल्या चोरांबे या मुळ गावी पावसाने उघडीप दिली असल्यामुळे घरच्या शेतीमध्ये भात लागणीत व्यस्त आहेत.

तरुणाईत सदाभाऊच्या या शेतीविषय आवडीमुळे जावलीत चांगलीच चर्चा रंगू लागल्या आहेत. जावलीत आमदारकी भोगलेले सदाशिव सपकाळ शिवसेनेकडून निवडून आलेले एकमेव आमदार होते. सदाभाऊचा राजकीय व्यासंग जेवढा मोठा आहे, तसा त्यांच्या व्यक्तिगत जीवनात शेतीचे स्थान अन्यनसाधारण राहीलेले आहे . सर्वसामान्य माथाडी कामगाराचा सुपूत्र असलेले सदाशिव सपकाळ शेती त्याच्या रक्तात आहे.

सध्या लाॅकडाऊन सुरु आहे, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव डोकेदुखी झाला आहे. मात्र जावलीत माजी आमदार मात्र भात शेती करण्यात मग्न असल्यामुळे जावलीचे माजी आमदार सध्या काय करतात या प्रश्नाला भातशेती हेच उत्तर सध्या त्याच्या भातलागण कृतीतुन दिसून आले आहे. अनेकजण या शेतातील आपल्या माजी आमदारांचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत आहेत.