नारायण राणेंच्या घरात घुसून हिशोब चुकता करु; शिवसेना आमदाराचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजपच्या जन आशिर्वाद यात्रेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यामुळे अशिवसेना पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. दरम्यान, शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी मंत्री नारायण राणेंना थेट इशारा दिला आहे. “भाजपचे नेते तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत बेताल वक्तव्ये केली जात आहेत. अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या राणेंच्या घरात घुसून हिशोब चुकता करू, असा इशारा यावेळी गायकवाड यांनी दिला.

केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री युद्ध ठरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत शिवसैनिकांकडून नाशिक येथे भाजप कार्यालयाची तोडफोडही करण्यात आली आहे. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांकडून मंत्री राणेंना थेट इशाराही दिला जात आहे. दरम्यान आज शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी नारायण राणेंना थेट इशारा दिला आहे.

मंत्री राणेंनी नुकतीच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. तर दुसरीकडे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी मंत्री राणेंना थेट आव्हान दिले आहे. मंत्री राणेंच्या वक्तव्यानंतर नारायण राणे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वाद अजून विकोपाला पोहचला आहे.

Leave a Comment