मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी काल बहुमत असलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला म्हणजेच शिवसेनेला निमंत्रण दिले होते. मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेस कडून शिवसेनेला सत्ता स्थापनेच्या पाठिंब्याचे पत्र न मिळाल्यामुळे सेना पुन्हा बॅकफूट वर गेली आहे. काल संध्याकाळी सेनेचे शिष्टमंडळ यांनी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली. त्यात त्यांनी सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी अधिकचे तीन दिवस मागितले होते. मात्र यावर राज्यपाल यांच्या कडून वेळ वाढवून देण्यास नकार देण्यात आल्यामुळे नितेश राणे यांनी ट्विटर वरून शिवसेनेवर त्यांच्या टॅगलाईन असलेल्या ‘हीच ती वेळ’ असे ट्विट करत सत्ता स्थापन करण्यास अडचणीत सापडलेल्या सेनेला टोला लगावला आहे.
भारतीय जनता पक्षाने शिवसेनेसोबत सत्ता स्थापन न करण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेना चांगलीच अडचणीत सापडली आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री कारेन असा शब्द बाळासाहेब यांना दिला असल्याचे परवा उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी अडून बसलेली शिवसेना आता सत्ता सत्तास्थापनेसाठी कुठला फॉर्मुला आजमावते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
हीच ती वेळ !!!
— nitesh rane (@NiteshNRane) November 11, 2019