व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पाठिंबा देण्याच्या पत्रावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपली

मुंबई प्रतिनिधी : राज्यातील सत्तास्थापनेचा खेळ आता चांगलाच रंगत आलेला आहे. काल शिवसेनेला सत्तास्थापनेचे पत्र काँग्रेस-राष्ट्रवादीने वेळेत दिले नसल्याने सेना सत्ताखेळात तोंडघशी पडली होती. दरम्यान राज्यपाल कोशियारी यांनी राष्ट्रवादीला आता सत्तास्थापनेची संधी दिली. मात्र आता सत्तास्थापन पाठिंब्याच्या पत्रावरून काँग्रेस-राष्ट्रवादी एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत.

केवळ आमच्या पाठिंबा असल्याच्या पत्राचा काही एक उपयोग होत नव्हता. काँग्रेसनेच आपला निर्णय घेण्यात विलंब लावला असं विधान अजित पवार यांनी या संपूर्ण प्रकरणावर केलं आहे. तसेच एका दिवसात सर्व आमदारांची जुळवाजुळावं करण अशक्य आहे. काँग्रेसचे आमदार जयपूरला तर श्रेष्ठी दिल्लीत अशा परिस्थितीत चर्चाना उशीर लागला असं स्पष्टीकरण दिले.

तर काँग्रेस सेनेला पाठिंबा देण्याबाबत राष्ट्रवादीशी स्पष्ट चर्चा न झाल्याने पाठिंब्याचे पत्र देऊन काही फायदा नाही असे सांगितले. तसेच सगळ्या आमदारांच्या पत्रावर सह्या होणं नंतर ते सादर करणं या सर्व घाईत झालं असतं. आम्हाला पत्र देण्यास उशीर झाला हे वास्तव आहे. असं काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. तेव्हा आज हा सत्तास्थापनच नेमकं काय होणार हे अधांतरीच आहे.