हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचा मंत्रालयाच्या उपहारगृहामध्ये दारूच्या बाटल्यांचा खच सापडल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. या घटनेवरून भाजपच्या नेत्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला होता. त्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत भाजपला टोला लगावला आहे. “दारूच्या बाटल्या या काही आमच्या काळातील नाहीत. त्याबद्दल जर अधिक माहिती हवी असेल तर त्या भाजपने लॅबमध्ये पाठवाव्यात त्यानंतर समजेल कि त्या बाटल्या कोणाच्या काळातील आहे,” असा टोला राऊतांनी लगावला आहे.
भाजपला टोला लगावताना राऊत पुढे म्हणाले की, काल जो मंत्रालयात बाटल्या सापडण्याची घटना घडली. त्यावरून आता भाजपकडून राजकारण केले जात आहे. उगीच मंत्रालयाला बदनाम केले जात आहे. राज्यातील मंत्रालयात बाटल्या सापडल्या आहेत. त्याविषयी जे भाजप बोलत आहे. मात्र, आधिकाऱ्यांकडून अशी माहिती मिळाली आहे कि, त्या बाटल्यांचा खच दीड वर्षांपूर्वीपासून आहे. या बाटल्या आताच्या नाही दीड वर्षापूर्वीच्या आहेत. वर्षभर तर मंत्रालय बंदच होते.
आता या बाटल्या सापडल्या आहेत. त्या विषयी जास्त माहिती घेण्याची घाई भाजपला आहे. त्यामुळे याविषयी जर जास्तच माहिती हवी असेल तर भाजपण त्या बाटल्या तपासण्यासाठी लॅबमध्ये पाठवाव्यात. याची तपासणी झाल्यानंतर केले कि किती जुन्या आहेत, असा टोला यावेळी संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.