देशभरात कुठेही एकच आघाडी व्हायला हवी अशी आमची भूमिका – संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत आज काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. तसेच कालही त्यांनी सोनिया गांधी यांची भेट झाली त्यावेळी त्यांनीही उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीविषयी चौकशी केली. दरम्यान आज प्रियांका गांधी यांना राजकीय घडामोडीसंदर्भात पहिल्यांदाच भेटत असल्याची माहिती राऊत यांनी दिली आहे. प्रियांका गांधी यांना राजकीय घडामोडीसंदर्भात पहिल्यांदाच भेटतोय. तसेच देशभरात कुठेही एकच आघाडी व्हायला हवी, अशी आमची भूमिका आहे. शरद पवार यांची देखील अशीच भूमिका आहे, असे महत्वाचे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या घडामोडीसंदर्भात राहुल गांधी माझ्याकडून भेट घेत असतात. प्रियांका गांधी यांना राजकीय घडामोडीसंदर्भात पहिल्यांदाच भेटतोय. देशभरात कुठेही एकच आघाडी व्हायला हवी, अशी आमची भूमिका आहे. तर, शरद पवार यांची देखील भूमिका आहे. त्या काँग्रेसच्या महासचिव आहेत त्यामुळं भेटायला काही हरकत नाही. त्यांनी भेटण्यासंदर्भात इच्छा व्यक्त केली. मी पक्षाचा शिवसैनिक आहे, त्यामुळे इकडे बसून जे काय करतो ते त्यांच्या आदेशानं करत असतो. घडामोडी ज्या घडतात ज्यात आम्ही सहभागी होत असतो ती उद्धव ठाकरेंना देत असतो. महाराष्ट्रात आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी, लहान घटक पक्ष यांच्या साथीने सरकार चालवतो. हा मिनी यूपीएचा प्रयोग हा क्रांतिकारक आहे. देशात याची चर्चा सुरु आहे.

राहुल गांधी यांना भेटण्यापूर्वी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. प्रियांका गांधी या काँग्रेसच्या प्रमुख नेत्या आहेत. निर्णय प्रक्रियेत त्या सहभागी असतात. त्यांना आमच्याशी एका विषयावर चर्चा करायची असेल तर आमचं ते कर्तव्य आहे. यूपीए अधिक मजबूत व्हायला पाहिजे हे सगळ्यांचं म्हणनं आहे. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी एका चांगल्या भावनेनं सांगितलं आहे. जेव्हा आपण एखादी लढाई लढतो त्यावेळी गट तट असं न करता जी आघाडी आहे ती मजबूत करायला हवी. राहुल गांधी यांनी पुढाकार घेतला असल्यास शरद पवार यांनी पुढाकार घेऊ नये, असं नाही. शरद पवार यांच्या ऊंचीचा नेता देशात नाही. देशभरात कुठेही एकच आघाडी व्हायला हवी, अशी आमची भूमिका आहे. तर, शरद पवार यांची देखील भूमिका आहे.

Leave a Comment