शिवसेना अजून यूपीएचा भाग नाही मात्र, सध्या मिनी यूपीएचा प्रयोग सुरू – संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार यांच्यामध्ये विधान परिषद निवडणुकीवरून वादंग सुरु असताना दिल्लीत मात्र, वेगळ्याच घडामोडी घडू लागल्या आहेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष तथा खासदार शरद पवार हे दिल्लीला गेले असून त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी याची भेट घेतली आहे. या भेटीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी शिवसेना अजून यूपीएचा भाग नाही. मात्र, सध्या मिनी यूपीएचा प्रयोग सुरू आहे. काही सकारात्मक चर्चा झाल्या असल्याचे राऊत यांनी सांगितले.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया यांच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत काल बैठक झाली. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती, भविष्यात असलेल्या 5 राज्यांच्या निवडणुका यावर प्राथमिक चर्चा झाली. काहीही निर्णय झाला नाही. सोनियांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला. काही सकारात्मक चर्चा झाल्या.

संदेशाची जनता सध्या महागाईच्या वणव्यामध्ये होरपळत आहे. मात्र, यावर राज्यसभेत चर्चा होऊ दिली जात नाही. यावर संसदेत आज वादळी चर्चा केली जाणार आहे. बाळासाहेब ठाकरे आणि सावरकर यांनी हिंदुत्व रुजवले. बाळासाहेब एकमेव नेते होते. त्यांनी करून दाखवले. देशात हिंदू व्होट बँक आहे हा विचार पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे यांनी मांडला. बाकी सगळे पळून गेले. आमचे हिंदुत्व पळपुटे नाही. आमचे हिंदुत्व राजकारण, निवडणूक यासाठी नाही, असा टोलाही यावेळी राऊतांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.

Leave a Comment