नारायण राणे तुमची कुंडली आमच्या हाती; राऊतांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॅबिनेटमंत्री नारायण राणे यांनि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जन आशीर्वाद यात्रेत घणाघाती टीका केली. तसंच आजच्या यात्रेतही त्यांनी म्हुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला. यावरून शिवसेना खासदार विनायक राऊत हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका करणाऱ्या नारायण राणेंची कुंडली आमच्या हाती असल्याची टीका राऊत यांनी केली आहे.

भाजपची जन आशीर्वाद यात्रा सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. ती म्हणजे कॅबिनेटमंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री ठाकरेंवरील वादग्रस्त विधानामुळे होय. राणेंच्या एका विधानामुळे शिवसेनेचे खासदार, आमदार राणेंवर तुटून पडले आहेत. आजही राणेंनी जन आशीर्वाद यात्रेत मुख्यमंत्रयांवर टीकास्त्र डांगळे. यावरून शिवसेना खासदार विनायक राऊतांनी राणेंवर घणाघाती टीका केली आहे.

शिवसेना, मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका करणाऱ्या राणेंनी एक गोष्ट लक्षात घ्यावी कि त्यांची कुंडली आमच्या हातात आहे. ज्या राणेंना भाजपने पक्षात घेतले आहे त्यांच्याकडून पक्षातली वातावरण गढूळ करण्याचे काम केले जात असल्याची टीका राऊतांनी केली आहे.

Leave a Comment