व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

अपघाती मृत्यू झालेल्या छानवाल कुटुंबीयांचे शिवसेनेच्या वतीने सांत्वन

सर्वतोपरी मदत करण्याचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंचे प्रतिपादन

औरंगाबाद : अपघाती मृत्यू झालेल्या छानवाल कुटुंबीयांचे शिवसेनेच्या वतीने सांत्वन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना छानवाल कुटुंबीयांच्या पाठीशी असून, सर्वतोपरी मदत करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते,  माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिले. यावेळी खैरे यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

२ एप्रिल रोजी राष्ट्रीय महामार्ग सोलापूर – धुळे या रस्त्यावर वैजापूर तालुक्यातील परसोडा येथील संजय छानवाल व मीना छानवाल या दाम्पत्याचा अपघाती मृत्यू झाला होता. करोडी येथील पुलाखाली छानवाल यांची दुचाकी (एमएच २० डीएक्स ३१७९) ला मालवाहू ट्रक क्रमांक (जीजे ०३ बीडब्लू २७८६) ने दाम्पत्यास चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे छानवाल कुटुंबातील कर्ते पुरुष व स्त्री यांच्या दुर्दैवी मृत्यूने कुटूंबाचा आधार गेला आहे.

सदरील ट्रक व राष्ट्रीय महामार्ग यांच्या चुकीमुळे झालेल्या अपघातामुळे नियमाप्रमाणे विमा कंपनीकडून भरपाई देण्याची मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली. यावेळी आमदार रमेश बोरणारे यांनी जिल्हा प्रशासनामार्फत या शेतकरी कुटुंबातील सदस्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे सांगितले. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार प्रा. रमेश बोरनारे, उपजिल्हाप्रमुख आनंद तांदूळवाडीकर, तालुकाप्रमुख सचिन वाणी,  डॉ. सतीश लोहाडे – जैन आदींसह नागरिक उपस्थित होते.