हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या राज्यातील राजकारण मोठ्या प्रमाणात तापले आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केले होते. तसेच राणे यांनी उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावरून आता शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी या गोष्टीचा निषेध म्हणून महाराष्ट्रात ठिकठिकाणी त्यांनी भाजपच्या कार्यलयासमोर दगडफेक केली आहे.
शिवसेनेचे तालिबानी रुप!
शर्जिल उस्मानी समोर शिवसेनेने गुढघे टेकून सपशेल शरणागती पत्करली आणि नारायण राणेंसमोर पुरुषार्थ दाखवते आहे.
धिक्कार!!!#NarayanRane
— Sunil Deodhar (@Sunil_Deodhar) August 24, 2021
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. नारायण राणे यांच्याविरोधात नाशिकमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे. त्यानंतर राणेंच्या अटकेचे आदेश नाशिक पोलीस आयुक्तांनी दिली होते. यानंतर नारायण राणे यांनी रत्नागिरी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्जाची याचिका दाखल केली होती. पण न्यायालायने जामीन अर्ज फेटाळला आहे.
या सगळ्या प्रकारावरून भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजपचे नेते सुनील देवधर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून राज्यातील सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये ”शर्जिल उस्मानी समोर शिवसेनेने गुढघे टेकून सपशेल शरणागती पत्करली आणि नारायण राणेंसमोर पुरुषार्थ दाखवते आहे.” अशी टीका केली आहे.