मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेची घोषणा होताच गोव्यात शिवसेना आमदारांचा जल्लोष

Shivsena MLA
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पणजी : वृत्तसंस्था – महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या आठ ते दहा दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडींना अखेर आज पूर्णविराम मिळताना दिसत आहे. कारण महाविकास आघाडी सरकार कोसळले असून शिवसनेचे बंडखोर आमदार आणि भाजप यांच्या युतीचं सरकार स्थापन होणार आहे. बंडखोर नेत्यांचे प्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आज गोव्यातून मुंबईत दाखल झाले. त्यांनी फडणवीसांसोबत आज राजभवनावर जावून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा केली. यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. कारण ठाकरे सरकार कोसळल्यानंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा अंदाज बांधला जात होता. पण फडणवीसांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाची घोषणा केली आणि सगळ्यांचा मोठा धक्का बसला. त्यांच्या या निर्णयामागे नेमके काय राजकारण आहे हे लवकरच स्पष्ट होईल.

यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून घोषणा झाल्यानंतर तिकडे गोव्यातील ताज हॉटेलमध्ये थांबलेले शिवसेनेचे इतर बंडखोर नेते यांचा आनंदाचा पारा राहिला नाही. त्यांनी ताज हॉटेलमध्ये प्रचंड जल्लोष केला. शिवसेनेच्या सर्व आमदारांचा आनंद गगनात राहिला नाही. आमदार अक्षरश: टेबलवर चढून नाचत होते. हे सर्व नेते ‘नाथांचा नाथ एकनाथ’ या गाण्यावर नाचताना दिसले. त्यांच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
शरद पवारांकडून एकनाथ शिंदेंचे अभिनंदन; व्यक्त केली ‘ही’ अपेक्षा

मुख्यमंत्रीपदी घोषणा झाल्यानंतर एकनाथ शिंदेनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया; म्हणाले कि…

देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाबाहेर!! नेमका काय असेल रोल??

अजून एका सातारकराची मुख्यमंत्रीपदी वर्णी; शरद पवारांनी एकनाथ शिंदेंना दिल्या खास शुभेच्छा

Karnataka Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ !!!