कराड | शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, महाराष्ट्र एसटी सेनेचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष, कराडचे माजी नगरसेवक रामचंद्र विष्णुपंत रैनाक ऊर्फ रामभाऊ रैनाक (वय-62) यांचे सोमवारी दि. 21 रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. रामभाऊ रैनाक हे शिवसैनिक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली कराडमध्ये 1980 च्या दशकात सात नगरसेवक निवडून आले होते. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
रामभाऊ रैनाक हे संघटन कौशल्य, उपक्रमशीलता व मनमिळावू स्वभावाच्या रामभाऊ रैनाक यांनी कराड शहर तसेच तालुक्यामध्ये शिवसेनेचा प्रसार आणि आणि प्रचार सुरू केला. संपूर्ण तालुक्यांमध्ये शिवसेनेचा विचार रुजवण्यामध्ये आणि वाढविण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. शिवसैनिक तशी भावना व्यक्त करत असतात. गेल्या तीन दशकाहून अधिक काळ कराड तालुक्यामध्ये शिवसेनेचे सक्रीय कार्यकर्ते म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्यावर सातारा उपजिल्हा प्रमुख पदाची धुरा जबाबदारी पडली होती. त्यासह एस. टी कामगार सेनेच्या कार्यात देखील त्यांनी आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला होता.
कराड तालुक्यातील सर्वात ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या रामभाऊ रैनाक यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कराड येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये कराड तालुक्यातील शिवसैनिकांवर एकापाठोपाठ एक असे दुःखाचे प्रसंग सुरू आहेत. शिवसेनेचे सातारा जिल्हा प्रमुख चंद्रकांत पवार, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख अशोक भावके, माजी शहर प्रमुख राजेंद्र जाधव, उपतालुका प्रमुख भिमराव कळंत्रे, कराड उपशहरप्रमुख कुलदीप जाधव या पदाधिकारी शिवसैनिकांच्या अकाली निधनाच्या धक्क्यातन सावरणाऱ्या शिवसेनेवर रामभाऊ रैनाक यांच्या अकाली निधनाने दुःखाचा डोंगर कोसळला. कराड नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा श्रीमती छाया रैनाक यांचे पती होत.