मुंबई प्रतिनिधी | शिवसेनेने काढलेल्या शेतकरी मोर्च्याबद्दल शिवसेनेवर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. यात मनसे देखील मागे राहिली नाही. मनसेने तर शिवसेना एका रोगाची शिकार झाली आहे अशी जळजळीत टीका करून शिवसेनेला चांगलेच खिंडीत पकडले आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेने काढलेल्या मोर्चाला चांगलेच घेरले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर खात्यावरुन शिवसेनेला एकाच वाक्यात चांगलेच घेरले आहे. शिवसेनेला मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा आजार झाला आहे. त्यामुळे शिवसेना अशा प्रकारे मोर्चे काढत सुटली आहे असे संदीप देशपांडे यांनी म्हणले आहे. शिवसेनेने शेतकरी पीक विम्यासाठी काढलेल्या मोर्चावर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठवली जात आहे. शिवसेने आज आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वात आज मोर्चा काढला होता. त्या मोर्चात शिवसेने शेतकऱ्याचे पीक विमे लवकरात लवकर द्यावेत असे म्हणले होते.
दरम्यान अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी देखील या मोर्चाला चांगलेच घेरले. विधानसभा निववडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने काढलेला हा मोर्चा मला ढोंगी वाटतो. शेतकऱ्यांची कर्ज माफीच्या नावावर केली गेलेली फसवणूक शिवसेनेने सत्तेत राहून गप्प का बघितली याचे उत्तर शिववसेनेने द्यावे असे राणा म्हणाल्या आहेत. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सरकार मध्ये सहभागी असताना जबाबदारी झटकणे म्हणजे शिवसेनेचा आजचा मोर्चा आहे असे म्हणले आहे.