महाबळेश्वर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
शिवसेना पक्षाचा ५५ वर्धापनदिन शनिवारी उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यभर विविध ठिकाणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने अनेक उपक्रम वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आले होते. महाबळेश्वर येथेही शिवसेनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे सातारा जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे व माजी जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
महाबळेश्वर येथील हनुमान मंदीरात महाबळेश्वर शिवसेना शाखेच्या वतीने शिवसेनेचा 55 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्यापूर्वी जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे व माजी जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे यांच्या हस्ते शिवसेना पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्व शिवसैनिकांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी यशवंत घाडगे म्हणाले, “मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना हा मोठा पक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. शिवसेनेने प्रारंभा पासुन सर्वसामान्य मराठी माणसांचे नेतृत्व केले आहे. त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडुन ते प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना कायम आक्रमक राहिलेलीआहे. अशा आक्रमक संघटनेचे आम्ही मावळे आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
यावेळी माजी जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच शिवसैनिकांना शिवसेना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी वर्धापनदिनाच्या कार्यक्रमास नगरसेवक संजय पिसाळ, शहर प्रमुख महेश गुजर, राजेंद्र पंडीत, राजेश सोंडकर, बंडु फळणे, प्रशांत मोरे, ताथवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.