Sunday, June 4, 2023

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अटकेच्या मागणीसाठी शिवसेनेचे ‘जोडे मारो’ आंदोलन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

भाजपचे नेते किरीट सोमय्या सातत्याने महाराष्ट्र विरोधी काम करत असून त्यांनी भारतीय नौदलातील आयएनएस विक्रांत या युद्धनौच्या डागडुजी साठी लोकांकडून पैशांच्या स्वरूपात वर्गणी गोळा केली. सदरचे पैसे हे संबंधित विभागाकडे जमा न करता त्यांनी ते पैसी खाल्ले. अशी माहिती माहिती अधिकारातून उघड झाली.

त्यामुळे किरीट सोमय्या यांच्यावर तातडीने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने सांगलीतील स्टेशन चौक येथे आंदोलन करण्यात आले. रिकाम्या मडक्याला सोमय्या यांची प्रतिमा लावून त्याला चपलांचा हार घालत जोडे मारत मडके फोडून निषेध करण्यात आला. यावेळी सोमय्या यांना संगलो जिल्ह्यात फिरू देणार नसल्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला.