दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांची बाजी; भाजपचा दारुण पराभव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी बाजी मारली आहे. कलाबेन डेलकर यांनी भाजपच्या महेश गावित यांचा 47447 मतांनी पराभव केला आहे. कलाबेन डेलकर यांच्या विजयामुळे महाराष्ट्राबाहेर प्रथमच शिवसेनेचा खासदार विजयी झाला आहे.

कलाबेन डेलकर यांना 1 लाख 16 हजार  834 तर भाजपच्या महेश गावित यांना 66 हजार 157 मतं मिळाली आहेत. कलाबेन डेलकर यांनी भाजपच्या उमेदवाराचा 47447 मतांनी पराभव केला आहे.

दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेनेनं मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना संधी देत महाराष्ट्राबाहेरील पोटनिवडणूक लढवली. शिवसेनेच्या कलाबेन डेलकर, भाजपचे महेश गावित आणि काँग्रेसचे महेश धोदी यांच्यात तिरंगी लढत झाली होती.

Leave a Comment