औरंगाबाद : पैठण नगरपरिषद हद्दीतील ३० कोटींचा भूखंड हडपण्याचा आरोप मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर करण्यात आला. असे असताना पैठणचे नगाराध्यक्ष सुरज लोळगे यांनी अद्याप शब्दही काढलेला नाही. तसेच त्या भूखंडाची चौकशीचे आदेश देखील दिलेले नाहीत.
मात्र, भाजपच्या वतीने करण्यात आलेल्या आरोपामुळेच शिवसेनेच्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला होता. असे असताना संदीपान भुमरे यांच्या बाबत मात्र, भाजप गप्प का? असा प्रश्न नागरीक उपस्थित करत आहेत.
पैठण नगर परिषदेमधील या भूखंड घोटाळ्यात चौकशी नंतर सत्य समोर येईल. मात्र, दत्तात्रय गोर्डे यांच्या वतीने करण्यात येणारे आरोप गंभीर आहे. त्यामुळे याची कमीत कमी चौकशी व्हावी आणि सत्य सर्वांसमोर यायला हवे. मात्र, त्यासाठी आवश्यकता आहे ती राजकीय इच्छाशक्तीची असे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.