हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराजांविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या एकाला शिवसैनिकांनी बेदम मारहाण करून गावात धिंड काढली. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी-कोकोवाडा गावात ही घटना घडली. दरम्यान आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला शिवसैनिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले.
याबाबची अधिकची माहिती अशी, जितेंद्र राऊत नावाच्या व्यक्तीने शिवाजी महाराज आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी सतत आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केली होती. यासंदर्भात स्थानिक शिवसैनिकांनी पोलिसात तक्रार केली असता पोलिसांनी त्याला ठाण्यात बोलावून समजही दिली होती. मात्र, यानंतरही राऊत याने आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणं चालूच ठेवल्या असं शिवसैनिकांच म्हणणं होत.
अखेर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी पेंढरी-कोकेवाडा या गावात जाऊन राऊत याला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्या तोंडाला काळे फासून, गळ्यात चप्पलांचा हार घालून गावातून त्याची धिंड काढली. तसेच त्याने केलेल्या पोस्ट बद्दल शिवासैनिकांनी त्याच्याकडून माफी देखील मागून घेतली.या संपूर्ण प्रकरणात गुन्हे नोंदविण्याची कारवाई सुरू असून सिंदेवाही पोलीस करत आहेत.
शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याला शिवसैनिकांनी दिला बेदम चोप, चंद्रपूरमध्ये घडली घटना pic.twitter.com/jcv2Z4jGmY
— sachin salve (@SachinSalve7) March 20, 2020
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.